एनटीपीसी सोलापूर येथे बालिका सशक्तीकरण मिशन (GEM) उन्हाळी कार्यशाळा सुरू, उज्ज्वल भविष्यासाठी मुलींना सक्षम करणे.
तरुण मुलींना सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नात, एनटीपीसी चा प्रमुख CSR उपक्रम, बालिका सशक्तीकरण मिशन (GEM) उन्हाळी कार्यशाळा चे 10 मे 2024 रोजी एनटीपीसी सोलापूर येथे सुरूवात झाली. उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे श्री कादर शेख, जिल्हा शिक्षणाधिकारी-सोलापूर, विशेष अतिथी श्री मल्हारी तुकाराम बनसोडे, गटशिक्षणाधिकारी-दक्षिण सोलापूर, आणि डॉ. विजया महाजन, प्राध्यापिका-सामाजिक कार्य, वालचंद कॉलेज, सोलापूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाला श्री तपन कुमार बंदोपाध्याय, HOP (सोलापूर), जे ऑनलाइन थिम्स विडिओ द्वारे सामील झाले होते आणि श्री बिपुल कुमार मुखोपाध्याय, GM (O&M), श्रीमती. जयमाला मुखर्जी, उपाध्यक्षा सृजन महिला मंडळ, एचओडी, युनियन आणि असोसिएशनचे प्रतिनिधी आणि इतर कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते .
श्री. तपन कुमार बंदोपाध्याय, एचओपी (सोलापूर), यांनी तरुण मुलींना त्यांची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम करण्यासाठी एनटीपीसी ची वचनबद्धता व्यक्त केली. श्री बिपुल कुमार मुखोपाध्याय, GM (O&M) यांनी सहभागींना प्रदान केलेल्या संधींचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी आणि शिक्षण स्वीकारण्यास प्रोत्साहित केले.
श्री. कादर शेख यांनी उपस्थिताना संबोधन करताना स्थानिक मराठी भाषेत संदेश देत, समृद्ध राष्ट्र निर्माण करण्यासाठी मुलींना शिक्षण देण्याचे महत्त्व पटवून दिले. डॉ. विजया महाजन यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आणि एनटीपीसी च्या विचारशील उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
GEM-2024 साठी जवळपासच्या शाळांमधील एकूण 45 मुलींची नोंदणी झाली आहे, नोट्रे डेम स्कूल, NTPC सोलापूर, त्यांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. GEM उपक्रमाचा उद्देश सर्जनशीलता वाढवणे, मानसिक आणि सामाजिक विकास वाढवणे, आणि शिकण्याला चैतन्यशील बनविणे आणि सहभागींसाठी परिणामकारक अनुभव अनुभव निर्माण करणे हा आहे.
संवाद कौशल्ये, प्राथमिक शिक्षण, स्वच्छता, पोषण, योग, खेळ आणि लैंगिक वैविध्य समस्यांवरील चर्चा यांचा समावेश असलेल्या अनुरूप कार्यक्रमांद्वारे, एनटीपीसी मुलींमध्ये अत्यावश्यक शिक्षण, आरोग्य आणि स्वसंरक्षणाविषयी जागरुकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवते.
शिवाय, कार्यक्रमात सामाजिक विषयांवर चित्रपट प्रदर्शित करणे, सायबर सुरक्षा सत्रे, आणि सहभागींची प्रतिभा आणि क्षमता प्रदर्शित करण्यासाठी संगीत, नृत्य आणि थिएटरसाठी संधी.
